
लोकवणी - विरेन्द्र पुणेकर
कढोली (बुज) : गेल्या वर्षापासून पोवणी, कढोली, हळस्थी मार्गाचे रुंदीकरनाचे काम चालू असून. सदर कयामत काही पूलांचे काम देखील होते त्यातील काही पूर्ण झाले काही अजून ही बाकी आहेत परंतु कामे गेल्या एक वर्षापासून ठप्प असून पावसात रस्त्याची पुनः दुर्दशा झाली आहे. रस्त्या काटी असलेले माती रस्त्यावर्ति आल्याने चिखलाचे साम्राज्य झाले आहे. चिखलात वाहतूक करणे धोकादायक ठरत असून कढोली गावातून जात असणार सीमेंट रोड चे काम आज ही तसेच एकावर्षा पासून प्रलंबित आहे सीमेंट रोड चे काम अर्धवट झाले असून अर्धवट सीमेंट रोड मधून बाहेर निघालेले लोखंडी रॉड वाहतूक करणाऱ्या नांगरीकांना धोकादायक ठरत आहे या अगोदर या लोखंडी रॉड वाहनात अळकून अपघात झाला होता यात वाहन चलकाच्या पायाला मोठी दुखापत देखील झाली होती हा अपघात मोठा नाही परंतु मोठा अपघात होणे नाकारता येत नाही व सीमेंट रोड मधून निघालेले रॉड ही धोकादायक आहे यात जीवाला धोका देखील होऊ शकते असे नगरिकातून बोलले जात आहे. सदर रोड मधून निघालेले रॉड अक्षरक्षा हाताणे बाहेर ओढल्यास हातात येत असून सदर रॉड दीखाव्या करीता टाकण्यात आले आहे असे रस्त्याची पाहणी करणाऱ्या नगरिकातून समोर आले आहे. रस्त्याच्या आजू - बाजूने नालीचे काम देखील याच काम बरोबर होणे होते ते कामही असेच अर्धवट असून भर पावसात पाण्याची वाट ही रस्त्यावरच असून मोठ-मोठे पाण्याचे खड्डे निर्माण झाले आहे. खड्ड्यात पानी साचले आहे. वाहतूक करणाऱ्या नागरिकांवर खड्डद्यातिल पानी ओसळून जात आहे. सदर रस्त्या वरुण एका बाजूने मोठे वाहन आल्यास दुसऱ्या बाजूने येणारे लहान वाहन देखील या मार्गातून पार होऊ शकत नाही. हीच समस्या गेल्या वर्षभरा पासून सातत्याने वाहतूक करणाऱ्या नागरिकांना सहन करावी लागत आहे. तरीही प्रशासन व कंत्रातदार या कळे दुर्लक्ष करीत आहे असे चित्र दिसून येत आहे.
.png)